संजय पाठक, नाशिक- संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झाली असून परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये माजी प्रंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची प्रतिमा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. परंतु आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली त्यांची प्रतिमा कागदाने झाकण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राजीव गांधी यांचे नाव महापालिकेच्या मुख्यालयाला देण्यात आले आहे आणि त्याच वास्तूत राजीव गांधी यांचा फोटो झाकण्याचा अजब प्रकार महापालिकेने केला आहे. मुळात दिवंगत नेत्यांच्या प्रतिमा झाकण्याची गरज नाही असे आदर्श नियमावलीतच नमूद असताना नाशिक महापालिकेने मात्र आचार संहिता पालनाचा अति उत्साह दाखवत दिवंगत नेत्यांच प्रतिमाच झाकली आहे.
महापालिकेच्या या कारभाराबद्दल सेवा दलाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेनेच आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केला आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च पासून आदर्श आचार संहिता लागु केली आहे. त्यामुळे पक्षांचे चिन्ह आणि प्रतिके झाकण्यात आल्या असून कोनशीला देखील अशाच झाकण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेने तर स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचा फलक झाकून ठेवला आहे.