शासनाने गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकडून दर दिवशी घेतल्या जात असलेल्या आरटीपीसीआर चाचण्या व सापडणारे बाधित रुग्ण याची माहिती गोळा केली असता, त्यात नगर, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग व नाशिकमध्ये दररोजचे काेरोना पॉझिटिव्हिटीचा दर अधिक असल्याबद्दल राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे. नगरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ७.५ पाॅझिटिव्हीटी दर असून, पुणे ६.४, सांगली ४.९, सिंधुदुर्ग ५.९, तर नाशिकचा दर ४.८ इतका आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटीचा वाढता दर पाहता, आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना शासनाने केल्या आहेत. चौकट=== ही आहेत धोकेदायक शहरे
* नगर- ७.५ * पुणे- ६.४ * सिंधुदुर्ग- ५.९ * सांगली- ४.९ * नाशिक- ४.८ * सातारा- ३.९ * पालघर- ३.६