नाशिक : दादा हे अजातशत्रू स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व होते. लेखक आणि माणूस म्हणूनदेखील ते तितकेच महान होते. सामान्य, नवोदित लेखकांच्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांना बळ देणारा साहित्यिक गमावला या शब्दांत मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केला.
सावानाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात झालेल्या या शोकसभेत साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या. विनोदी साहित्याचे दालन समृध्द करणारे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध साहित्य संस्थांना बळ देणारा ज्येष्ठ विनोदी साहित्यिक गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, संवाद, ग्रामीण साहित्य चळवळ यांच्याशी तसेच साहित्यात कार्यरत असलेल्या नवाेदितांशीदेखील त्यांचा निकटचा संबंध होता. या शोकसभेच्या वेळी नरेश महाजन, डॉ. यशवंत पाटील, गोकुळ वाडेकर, विजयकुमार मिठे, सुभाष सबनीस, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. गंगाधर अहिरे, बी. जी. वाघ, मानसी देशमुख, ॲड. नितीन ठाकरे, रवींद्र मालुंजकर, विनायक रानडे, वसंत खैरनार, ज्ञानेश्वर खराडे, राजेंद्र उगले यांनी दादा यांच्या आठवणींचा जागर केला. नानासाहेब बोरस्ते यांनी समारोप केला. शोकसभेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. विजय महामिने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शोकसभेसाठी संजय करंजकर, मधुकर झेंडे, प्रभाकर बागुल, राजा वर्टी, ॲड. अभिजित बगदे, अरुण घोडेराव, मुकुंद कुलकर्णी, प्रा. प्रशांत पाटील, प्रशांत केंदळे, विनायक रानडे, देवदत्त जोशी, अशोक भालेराव, भास्कर म्हरसाळे, भौय्यासाहेब कोठावळे, सुरेश पवार तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
२५ हजारांची देणगी
प्रत्येक वयोगटातील साहित्यिक आणि रसिकाशी स्नेहबंध जोडणारे दादा हे सर्वांना एका माळेत गुंफणारा एक धागा होते. हा रेशीमधागा नेमका रक्षाबंधनाच्या दिवशीच हरपल्याची खंतदेखील यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी निखिल विजय महामिने यांनी स्व. सौ. शीलाताई चंद्रकांत महामिने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालसाहित्य पुरस्कारासाठी २५ हजार रुपयांची देणगी दिली.
फोटो (२५शोकसभा)
महामिने यांच्या प्रतिमेला वंदन करताना मधुकर झेंडे. समवेत प्रा. यशवंत पाटील, जयप्रकाश जातेगावकर, नानासाहेब बोरस्ते, नरेश महाजन, विनायक रानडे, श्रीकांत बेणी आदी.