शहरातील रस्त्यांवर वाढली मोकाट जनावरे
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर मोकाट जणावरांचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. शहरासर उपनगरांमध्ये अजूनही उघड्यावर शिळे अन्न व भाजीपाला फेकले जात असल्याने मोकाट जनावरांना खाद्य मिळते. त्यामुळे अशी जणावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याचे दिसत आहे.
रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दुभाजकांवरील रोपांची पाण्याअभावी दुरावस्था
नाशिक : इंदिरानगर -पाथर्डी रस्त्यावर दुभाजकावर शोभीवंत वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, उन्हाळा सुरू झाल्यापासून या रोपांना नियमित पाणी मिळत नाही.त्यामुळे या शोभेच्या वनस्पती करपत असल्याचे दिसून येत आहे. या वनस्पतींना नियमित पाणी देण्याची मागणी हत आहे.