जूनपासून पावसाचा हंगाम सुरु होतो असे मानले जाते. मान्सूनचे जूनमध्ये आगमन होते. यावर्षीही मान्सूनचे आगमन जून महिन्यात अगदी वेळेवर झाले. यादरम्यान मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सरींनी सुरुवातीला जोरदार वर्दी दिली होती; मात्र काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली अन् सगळ्यांच्याच भुवया उंचविल्या अन् नजरा आकाशात दाटून येणाऱ्या मेघांकडे लागल्या. यंदा पावसाने दिलेली ओढ अन् वातावरणात होणारा बदल यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून ६जुलै रोजी ३३.३ अंश इतके कमाल तापमान पेठरोडवरील हवामान केंद्राकडून मोजले गेले.
---इन्फो---
पाच दिवस ‘ताप’दायक
सोमवारपासून पुढे पाच ते सहा दिवस शहरात उकाडा आणि ढगाळ हवामान अधिक जाणवण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पाच दिवसांत शहराचे कमाल तापमान २६अंश ते ३२अंशाच्यादरम्यान राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. गेल्या आठवड्यातसुद्धा पारा ३० ते ३३ अंशाच्यादरम्यान राहिला होता.
मान्सून सक्रिय होत असल्याची चिन्हे जरी दिसत असली तरी चालू आठवड्यात दमदार पावसाची शक्यता तशी कमीच असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात शहर व परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कमाल-किमान तापमानाचा पारा पंचवीशीच्या आतमध्ये स्थिरावण्याची चिन्हे असून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत.
---इन्फो--
आरोग्याची घ्या काळजी
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक बळावते. सध्या पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी हवामानात कमालीचा बदल झाला असून वातावरणात उकाडा अधिक वाढला आहे. पाऊस पुरेसा पडत नसून सकाळी ढगाळ हवामान तर दुपारी ऊन असे काहीसे अनुभवयास येत आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. शक्यतो थंड पदार्थ, तळलेले अन्न पदार्थ खाणे टाळावे, सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.
- डॉ. विकास गोगटे, फॅमिली फिजिशियन
---
आलेख-
२००८- ३१.२
२०१०-३१.३
२०१२- ३२.४
२०१५-३२.२
२०१८-३१.२
२०२०-३१.८
२०२१-३३.३
110721\11nsk_24_11072021_13.jpg
तापदायक