शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

‘त्या’ स्फोटसदृश गूढ आवाजाने नाशिककर हादरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:13 PM

नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात तितक्याच तीव्रतेने नाशिककरांच्या कानी पडल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.

नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात तितक्याच तीव्रतेने नाशिककरांच्या कानी पडल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.बुधवारी (दि.२२) सकाळी अचानकपणे झालेल्या जोरदार आवाजाने सगळ्यांनाच हादरवून सोडले. यावेळी काहींनी घरांची गच्ची गाठून आकाशाकडे डोळे लावले तर काहींनी तत्काळ घराबाहेर येऊन आपल्या परिसरात कुठे काही अनुचित घटना तर घडली नाही ना याची खात्री करून घेतली, मात्र कोठेही कोणालाही काहीही अनुचित घडल्याचे दिसून आले नाही. काहींनी तर जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्या आवाजाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने मुख्य अग्निशमन नियंत्रण मुख्यालयातही याबाबत चौकशीसाठी फोन खणखणले. सगळ्यांना उत्सुकता व कुतूहल होते ते त्या कानठळ्या बसवणाºया गूढ आवाजाचे, मात्र कोणालाच कुठूनही त्याबाबत उकल होऊ शकली नाही. तसेच सोशल मीडियावरसुद्धा हा गूढ आवाज चांगलाच घुमला. काही महिन्यांपूर्वी असाच आवाज शहरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ऐकू आला होता, मात्र तेव्हा फारसे काही लोकांचे लक्ष आपल्या व्यस्त दिनचर्येत याकडे वेधले गेले नव्हते.दरम्यान, या आवाजाची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली आणि याबाबत चौकशी सुरू झाली. जिल्हा आपत्ती कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधितांनी हा आवाज कसल्यातरी प्रकारच्या स्फोटाचा किंवा भारतीय तोफखान्याच्या तोफांच्या नियमित सरावाचा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच एचएएल ओझरस्थिती कंपनीत तयार केल्या जाणाºया हलक्या लढाऊ विमानांच्या चाचणीदरम्यान त्यांचा सुपरसॉनिक आवाज असल्याचेही सांगण्यात आले. हा आवाज विमानाची चाचणी घेताना अत्यंत उंचीवर विमाने नेली जातात तेव्हा ध्वनिलहरी आणि हवेचा संपर्क होऊन दाब निर्माण होतो आणि त्यातूनच असाच तीव्र सुपरसॉनिक आवाज ऐकू येतो, असे सांगण्यात आले. एचएएलनिर्मित हलके ‘तेजस’ हेदेखील सुपरसोनिक लढाऊ विमान मानले जाते.-------...काय आहे ‘सुपरसोनिक साउंड’जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटपेक्षाही अधिक असतो. या आवाजाला बºयाचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानाच्या चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचीक माध्यमात प्रेशर वेव्हच्या रूपात प्रवास करतो. पाण्याच्या तापमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर म्हणजेच ४ हजार ७२४ फूटपेक्षा जास्त मानला जातो, त्यामुळे साहजिकच हा सुपरसोनिक साउंड हा स्फोटसदृश असल्यासारखा भासतो.----...या भागात ऐकू आला आवाजहा आवाज पहिल्यांदा ओझर परिसरात ऐकू आला, तेथे त्याची तीव्रता अधिकच जाणवल्याचे राहिवाशांनी सांगितले. यावेळी हा आवाज काही सेकंदाने मखमलाबाद, दरी, मातोरी, पंचवटी, सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, डीजीपीनगर, नाशिकरोड, देवळाली गाव, जुने नाशिक या सर्व भागांमध्ये ऐकावयास आला.

टॅग्स :Nashikनाशिक