शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

करवाढविरोधात नाशिककर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:30 AM

महापालिकेने मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी कर योग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीविरोधात महापालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी सोमवारी (दि. २३) घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रांतील उद्योग व्यावसायिक व सामान्य नागरिकांनी ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून करवाढ रद्द झालीच पाहिजे,

नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी कर योग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीविरोधात महापालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी सोमवारी (दि. २३) घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रांतील उद्योग व्यावसायिक व सामान्य नागरिकांनी ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. टाळ चिपळ्या घेऊन वारकऱ्यांप्रमाणेच भाजपाचे आमदार शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, सीमा हिरे, तसेच शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलपही यात सहभागी झाले होते.  महापालिक ा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीचा निर्णय घेतल्याने शहरवासीयांवर लादलेली करवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकºयांसह व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांचे मेळावे होऊन जागृती केल्यानंतर अखेर सोमवारी नागरिकांनी   आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या करवाढीमुळे सत्ताधारी भाजपातही अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यामुळेच सोमवारी (दि.२३) करवाढीवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा घेण्यात आली. या महासभेचे लक्ष वेधण्यासाठी शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून नाशिककरांनी सकाळपासूनच आंदोलन करीत महापालिका मुख्यालयासमोर घोषणाबाजी व विरोध प्रदर्शन केले. अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वात करवाढीच्या विरोधात ‘मी नाशिककर’ या बॅनरखाली एकवटलेल्या नाशिककरांनी आंदोलनात पक्षीय मतभेद बाजूला सारून सहभाग नोंदवल्याने आंदोलनाची धार तीव्र केली. सर्वपक्षीय पदाधिकाºयांबरोबरच विविध उद्योग, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले. या आंदोलनात माजी मंत्री शोभा बच्छाव यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सल्लागार उन्मेश गायधनी, माजी महापौर अशोक मुर्तडक व अशोक दिवे, माजी स्थायी सभापती शिवाजी चुंभळे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, अ‍ॅड. तानाजी जायभावे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडदे, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, युवा शहराध्यक्ष बबलू खैरे, माजी अध्यक्ष शरद कोशिरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माकपचे नेते डॉ. डी. एल. कºहाड, करण गायकर, अ‍ॅड. चिन्मय गाढे, अ‍ॅड. संदीप गुळवे, सुनील आडके आदी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनात सहभागी होत करवाढीविरोधात निषेध व्यक्त केला, तर अजय बोरस्ते, गजानन शेलार, विलास शिंदेंसह काही विद्यमान नगरसेवकांनी आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी केल्यानंतर करवाढीचा प्रश्न सभागृहासमोर मांडण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला. आंदोलकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत करवाढ रद्द झालीच पाहिजे अन्यथा महापालिका मुख्यालयाला वेढा घालण्याचा इशारा दिला. यावेळी महापालिका मुख्यालयासमोरच आंदोलकांनी गर्दी केल्यामुळे शरणपूर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन काही काळ वाहतुकीला अडसर निर्माण झाला होता.भाजीपाल्यासह आंदोलनमहापालिकेने मोकळे भूखंड व शेती क्षेत्रावरही कर प्रस्तावित केल्याने शेतकºयांनी भाजीपालासोबत आणत भजनाच्या माध्यमातूनही करवाढीला तीव्र विरोध नोंदवला. महापालिकेच्या करवाढीमुळे शहरातील शेतकºयांनाही करवाढीचा भुर्दंड बसणार असल्याने आंदोलकांनी पालक वांगी, कोबी, फ्लॉवर, भोपळा यांसारख्या पालेभाज्या फळभाज्या व टरबुजांच्या पाट्या व क्रेट महापालिकेसमोर ठेवून आंदोलन केले. हरीत क्षेत्रात शेती असेल तर कर नाही मात्र, रहीवासी क्षेत्रात कर कायम ठेवण्यात आल्याने एकच भाजांचे वेगवेगळे दर सांगत शेतकºयांनी महापाािलकेची खिल्ली उडवली.आमदार खासदार रंगले भजनातमहापालिकेने केलेल्या करवाढीचा फटका सर्वसामान्य नाशिकरांसह शेतकरी, विविध उद्योग, व्यावसायिकांनाही बसणार आहे. त्यामुळे विविध व्यावसाय उद्योगांशी संबंधित संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत टाळ-मृदुंगाच्या गजरात विविध अभंग व भजनांचे गायन करून महापालिकेच्या करवाढीविरोधात निषेध नोंदवला. विशेष म्हणजे सत्तारूढ भाजपाचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांच्याबरोबरच शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप सहभागी झाले होते. माजी महापौर अशोक मुर्तडक हे देखील वारकºयाच्या वेशभूषेत सहभागी होते. या सर्वांनीच करवाढीचा विरोध केला. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका