नाशिकरोड : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी नाशिकरोड विभागातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. प्रभागाच्या भौगोलिक व्याप्तीनुसार १३-१४हून अधिक मतदान केंद्र राहणार असल्याने राजकीय पक्ष व उमेदवारांना नियोजन करताना चांगलेच नाकीनव येण्याची शक्यता आहे. मनपा निवडणुकीत नाशिकरोड विभागात शनिवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यामुळे मंगळवारनंतरच उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल होण्याची चिन्हे दिसत आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचा असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या त्यांच्या पूर्ततेसाठी चांगलीच वरवण सुरू झाली आहे. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी करून त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत कामाला सुरुवातदेखील केली आहे. प्रभाग १७, १८ व १९ ची मतमोजणी सामनगावरोड येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जिम्नॅशियम हॉलमध्ये व प्रभाग २०, २१ व २२ ची मतमोजणी दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात मतदान केंद्राची संख्या बघता राजकीय पक्ष व उमेदवारांना नियोजन करताना चांगलेच नाकीनव येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला दुसरा दिवसही निरंक
By admin | Published: January 28, 2017 11:18 PM