नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर बॅटरीवरील रायडोन मशीनद्वारे फरशी धुवून स्वच्छ केल्याने रेल्वेस्थानक चकाचक दिसत आहे.रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदारास देण्यात आला आहे. त्या ठेकेदाराचे ७० कर्मचारी रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे काम बघतात. व्हॅक्यूम मशीनद्वारे कार्यालयातील स्वच्छता व साफसफाई केली जाते. तर प्लॅटफॉर्मवरील फरशी बॅटरीवर चालणाऱ्या रायडोन मशीनद्वारे पुसून स्वच्छ केली जाते. बॅटरीवर चालणाºया रायडोन मशीनमुळे कमी वेळेत प्लॅटफॉर्मवरील फरशी धुवून स्वच्छ होते. यामुळे वेळेची बचत होत असून, दोन रायडोन मशीनद्वारे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मवर स्वच्छता केली जात आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानक झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:44 PM