शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

नाशिक - पिस्तुलाचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटले

By admin | Published: June 24, 2016 10:10 AM

चहा पिण्यासाठी जाणा-या दोघा भावंडांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून जबरीने रिक्षात बसवून सहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल लुटण्यात आले

ऑनलाइन लोकमत - 
रोकड, मोबाइल लंपास : अमृतधाम येथील घटना 
नाशिक, दि. 24 - चहा पिण्यासाठी जाणा-या दोघा भावंडांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून जबरीने रिक्षात बसवून सहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल लुटून नेल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी अमृतधाम वरदविनायक मंदिर रस्त्यावर घडली आहे. भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असुन ज्या विद्यार्थ्यांना लुटले ते विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  श्रीराम शेटे यांची नातवंडे आहेत. 
 
याबाबत आशितोष शेटे याने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशितोष व त्याचा चुलत भाऊ शाहू शेटे असे दोघे क का वाघ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असुन ते सध्या हिरावाडीतील अयोध्यानगरी येथे राहतात. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता आशितोष, शाहू व त्यांचा मित्र केतन रकिबे असे तिघेजण चहा पिण्यासाठी अमृतधामला जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातून एकजण उतरला व तुम्ही काल राहूल, विजय यांच्या बरोबर होते का असे विचारून माझ्याकडे पिस्तुल आहे तुम्ही रिक्षात बसा नाहीतर ठोकून टाकेल असा दम दिला. पिस्तुलाचा धाक दाखविल्याने तिघेही रिक्षात बसले नंतर संशयिताने रकिबेच्या खिशात सहा हजाराची रोकड असलेले पॉकिट काढून घेत त्याला सिगारेट आणण्यासाठी खाली उतरवून रिक्षा पाट रस्त्याने पेठरोड रोहीणीनगरला नेत पैशांची मागणी केली परंतु पैसे नाही असे सांगताच संशयिताने दोन मोबाइल जबरीने हिसकावून रिक्षातून पळ काढला त्यानंतर घाबरलेल्या दोघा भावंडांनी घडल्या प्रकराची माहिती नातेवाईकांना देत पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. 
 
घटनेची पुनरावृत्ती 
काही दिवसांपूर्वीच जुना आडगाव नाक्यावरून अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याला धाक दाखवून रिक्षात बसवून नेत लुटले होते. ज्या विद्यार्थ्याला लुटले तो शिर्डी येथे कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा होता. सदरच्या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शेटे यांच्या नातवंडांना लुटल्याने संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.