नाशिक : सर्वसामान्यांना आरटीओ कार्यालयात काम करणे सोपे व्हावे, या हेतूने प्रादेशिक परिवहन विभागाने आरटीओत वाहन परवाना, वाहन नोंदणी व इतर सुविधा आॅनलाइन करण्यात आल्या असल्यामुळे आरटीओ कार्यालयाजवळ स्मार्ट कार कॅफेचा विळखा लागला असून, या कारमध्ये लॅपटॉप, प्रिंटर, इन्व्हर्टर आणि इंटरनेट सेवा असल्यामुळे परिवहन विभागाचे परवाने काढणे, नूतनीकरण, पासिंग, बोजा कमी करणे अशी सर्व आॅनलाइन अर्ज कारमधून भरून दिले जात आहे.परिवहन विभागात चालणाऱ्या दलालांची साखळी तोडण्याच्या हेतूने परिवहन विभागाची सर्व कामे आॅनलाइन सुरू केली असली तरी लोकांना अर्ज करण्यासाठी कोणीतरी माहितगाराचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अर्ज भरण्यासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. शिवाय फॉर्म फी म्हणून ११३ व युजर सर्व्हिस चार्ज १०३ रुपये, पोस्टल चार्जेस आणि फी भरावी लागते. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरण करण्यासाठी जवळपास एक हजार रुपये लागतात त्यामुळे आॅनलाइन सेवा खर्चिक असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाय आॅनलाइन अर्ज करूनही कार्यालयात कागदपत्र जमा करण्यासाठी जावे लागते. मात्र आरटीओ कार्यालयातील कर्मचाºयांकडून सर्वसामान्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. येथील कर्मचारी ब-याचदा वेळेवर येत नाहीत, अशाही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.चौकट===कार कॅफेमध्ये मिळते फिटनेस सर्टिफिकेटवाहन परवान्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्मार्ट कॅफेमध्येच ५० ते १०० रुपये देऊन फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. त्यासाठी खासगी वाहनांचा आरटीओ कार्यालयासमोरच व्यावसायिक वापर केला जात आहे.