नाशिक : चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा सहभाग असल्याने या दोन्ही धावपटू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा तमाम नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.पटियाला येथील स्पर्धेतून कॉमनवेल्थसाठी पात्रता मिळविण्यास संजीवनीला अवघ्या एका मिनिटाचा वेळ कमी पडला असल्याने कॉमनवेल्थमध्ये खेळण्याचे संजीवनीचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाल्याने संजीवनीला पुन्हा एकदा कामगिरी करून दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षभर अॅथेलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारी संजीवनी कॉमनवेल्थची तयारी करीत असताना तिला त्यात यश आले नाही. असे असले तरी तिची आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.संजीवनी आणि पूनम सोनुने, आॅलिम्पिकपटू ललिता बाबर आणि पाचवेळा आशियाई स्पर्धेचा अनुभव असलेली पुण्याची स्वाती गाढवे यांचा भारतीय संघात समावेश असल्यामुळे या संघाचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असणार. संजीवनी ही मुख्य स्पर्धेत म्हणजेच ८ किलोमीटरमध्ये सहभागी होणार आहे तर पूनम ही अंडर-१२ गटात खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संजीवनीची स्पर्धा असल्याने तिच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. नाशिकच्या या दोन्ही धावपटूंनी अॅथेलेटिक्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आशियाई स्पर्धेपर्यंत मजली मारली आहे.संजीवनीचा फिजिकल फिटनेस प्रचंड असून, परदेशातील वातावरणातही ती चांगली कामगिरी करून देशाला पदक मिळवून देऊ शकते, असा विश्वास तिचे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे. पटियाला येथील स्पर्धेमुळे नाशिककरांनी काहीशी हळहळ व्यक्त केली होती. तसेच तिचे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनीदेखील संजीवनी कॉमनवेल्थमध्ये खेळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु अवघ्या मिनीटभराच्या अंतराने तिला कॉमनवेल्थ गाठता आले नसले तरी आता आशियाई क्रॉसकंट्रीत संजीवनी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांसह नाशिकच्या धावपटूंनी व्यक्त केला आहे.
धावपटू संजीवनी जाधव कडून पदकाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:49 PM
नाशिक : चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा सहभाग असल्याने या दोन्ही धावपटू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा तमाम नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देस्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संजीवनीची स्पर्धाभारतीय संघ मजबूत असल्याच्या दावा