नाशिक : आयुर्वेदापासून तर थेट ताणतणाव व्यवस्थापनासाठी ध्यानधारणेपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य उपचारपध्दती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे. या वेलनेस हबसाठी इगतपुरी-त्र्यंबके श्वरच्या दरम्यान येत्या महिनाभरात जागा निश्चित केली जाणार आहे.‘हेल्थ टुरिझम’ला चालना देण्यासाठी तसेच नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार असल्याचा विश्वास पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आशियामधील सर्वाेत्तम सोयीसुविधा व उपचारपध्दतीच्या दृष्टीने व्यापक असे वेलनेस हब नाशिकमध्ये उभे राहणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. हे वेलनेस हब मुंबईपासून जवळ असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसमवेत विदेशी पर्यटकांनाही वेलनेस हब आक र्षित करणारा ठरणार असल्याचे राठोड म्हणाले.
शंभर एकर जागेत साकारणार अत्याधुनिक ‘नाशिक वेलनेस हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:20 PM
नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
ठळक मुद्दे२०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार