नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्ष बुधवारी संध्याकाळी संपूर्णत: रिकामा झाला होता, मात्र गुरुवारी (दि.१९) या कक्षात विविध कोरोनाग्रस्त देशांची वारी करून आलेल्या दहा संशयितांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्रावचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठण्यात आले आहे. नाशिककरांची जबाबदारी अधिक वाढली असून, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अधिकाधिक काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात बुधवारी नव्याने एकही संशयित दाखल न झाल्याने आणि सर्व नमुनेही निगेटिव्ह आल्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला होता. गुरुवारी मात्र स्थिती पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले. संध्याकाळपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात सहा तर जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील विलगीकरण कक्षात एक असे सहा संशयित दाखल झाले होते; मात्र रात्री नऊ वाजेनंतर ही संख्या वाढली. जिल्हा रुग्णालयातील कक्षात एक कुटुंब दाखल झाल्याने संशयितांची संख्या नऊ वर पोहचली. यामध्ये सहा पुरूष तीन स्त्रीया एक अडीच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या सर्व संशयितांचे घशातील स्त्राव वैद्यकीय चमूकडून घेण्यात येऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतासह महाराष्टलाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्टत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सुदैवाने नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची धक्कादायक बातमी कानी आलेली नाही, तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच अत्यावश्यक आहे. जेणेकरून नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील पंधरा दिवस अधिक महत्त्वाचे राहणार असल्याचे ते म्हणाले. गुरुवारी जर्मनी, यूएसए, लंडन मलेशिया, अबुधाबी, फिनलॅँड या देशांमधून आलेल्या दहा कोरोना संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये गुरूवारी आढळले दहा कोरोना संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 9:23 PM
गुरुवारी जर्मनी, यूएसए, लंडन मलेशिया, अबुधाबी, फिनलॅँड या देशांमधून आलेल्या दहा कोरोना संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देगुरुवारी मात्र स्थिती पूर्णपणे बदलल्याचे दिसून आलेसाथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी