शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

नाशिककरांनी फेकला दहा हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:54 AM

सतरा दिवसांची आकडेवारी : दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाई नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ठेकेदारांसह खतप्रकल्पचालकाचीही कमाई झाली आहे.

सतरा दिवसांची आकडेवारी : दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाईनाशिककरांनी फेकला दहा हजार टन कचरा

नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ठेकेदारांसह खतप्रकल्पचालकाचीही कमाई झाली आहे.दीपोत्सवात घरोघरी लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिना-पंधरा दिवस अगोदर घरोघरी साफसफाई मोहिमेला वेग येतो. शहरात महापालिकेमार्फत कचरा उचलण्यासाठी २०६ घंटागाड्यांची व्यवस्था कार्यरत आहे. या घंटागाड्यांमार्फत प्रतिदिन सरासरी सुमारे ४५० टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जातो. महापालिकेने जानेवारी २०१७ पासून खतप्रकल्पही खासगी कंपनीला चालवायला दिलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या साफसफाईतून घराबाहेर काढण्यात आलेल्या कचºयाची आकडेवारी पाहिल्यास दि. १ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल साडेदहा हजार टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. या कालावधीत सरासरी प्रतिदिन ६५० टन कचरा निघाला आहे. प्रतिदिन सुमारे २०० टन कचरा अधिक निघाला आहे. आकडेवारीनुसार, दैनंदिन कचºयाव्यतिरिक्त १७ दिवसांत सुमारे ४ हजार टन जादा कचरा नाशिककरांनी घराबाहेर काढला आहे. १ ते १५ आॅक्टोबरया कालावधीत खतप्रकल्पावर घंटागाड्यांच्या ३४३८ फेºया झालेल्या आहेत. महापालिकेकडून घंटागाड्यांना टनानुसार कचºयाचा मोबदला दिला जातो. दिवाळीत जादा कचºयाची वाहतूक झाल्याने ठेकेदारांना जादा कमाई झाली असून, खतप्रकल्प चालविणाºया कंपनीचीही ‘दिवाळी’ साजरी झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, दि. १ आॅक्टोबरला ६४१ टन, दि. २- ६०२ टन, दि. ३-६१० टन, दि. ४- ५६७ टन, दि. ५ -५५८ टन, दि. ६- ५५२ टन, दि. ७- ५८१ टन, दि. ८-६५० टन, दि. ९-६४४ टन, दि. १०- ६३७ टन, दि. ११- ६२७ टन, दि. १२- ६१७ टन, दि. १३- ५९४, दि. १४- ६१८ टन आणि दि. १५-६६६ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे.भंगार बाजारातील कचराही खतप्रकल्पावर महापालिकेच्या वतीने दि. १२ आॅक्टोबरपासून सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची मोहीम सुरू आहे. पहिले तीन दिवस अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. रोज सुमारे १०० गाड्या कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जात आहे. त्यामुळे खतप्रकल्पावर कचºयाचे ढिगारे पहायला मिळत आहेत.