नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार पुन्हा नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:01 PM2019-11-23T20:01:11+5:302019-11-23T20:04:54+5:30
नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यातील माणिकराव कोकाटे आणि यांनी व्टीव्टरवरून पक्षाबरोबरच असल्याचा दावा केला असला तरी ते देखील संपर्कात नाही. नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार यांची देखील अशाच प्रकारे सापडत नाहीत तर दिलीप बनकर यांनी अजित पवार यांची भूमिका अधिकृतच असा दावा केल्याने देखील संशय निर्माण झाला आहे.
नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यातील माणिकराव कोकाटे आणि यांनी व्टीव्टरवरून पक्षाबरोबरच असल्याचा दावा केला असला तरी ते देखील संपर्कात नाही. नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार यांची देखील अशाच प्रकारे सापडत नाहीत तर दिलीप बनकर यांनी अजित पवार यांची भूमिका अधिकृतच असा दावा केल्याने देखील संशय निर्माण झाला आहे.
शनिवारची सकाळ राजकिय नेत्यांची झोप उडविणारी ठरली. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आज सकाळी राजभवनावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली. अजित पवार यांच्या समवेत चाळीस आमदारांचा गट असल्याची चर्चा पसरली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्टÑवादीचे सहा आमदार निवडून आले असून त्यातील किती जण अजित पवार यांच्य समवेत गेले अशी चर्चा सुरू झाली होती. सकाळी सिन्नरचे माणिकराव कोकाटे, निफाडचे दिलीप बनकर आणि दिंडोरीचे नरहरी झिरवाळ हे तिघे आमदार नॉट रिचेबल होते. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी ते पक्षाबरोबर असल्याचे सांगितले होते. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे या कोणाच्या दुरध्वनीला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र होते.
दरम्यान, दुपारी माणिकराव कोकाटे यांनी व्टिटरवर खुलासा केला. मी पक्षाच्या विरोधात नाही. आजित पवार यांच्या सांगण्यावरून मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला. तेथे काय होणार याबाबत काहीच माहिती नव्हते. पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय कदापि बदलणार नाही, असे त्यात नमूद केले होते. मात्र त्यांचा मोबाईल देखील नॉट रिचेबल आहे. नरहरी झिरवाळ देखील अशाच प्रकारे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. दिलीप बनकर यांनी नाशिकमध्ये येऊन खुलासा केला आहे. काल रात्री पक्षाकडून निरोप आल्याने आपण राजभवनावर गेलो. तेथे शपथविधी सोहळा पाहिला, परंतु त्याबाबत आपल्या अगोदर काहीच माहिती नव्हते असे सांगणाऱ्या बनकर यांनी अजित पवार यांची भूमिक म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका असल्याने कोणालाही फुटले असे कसे म्हणणार असा प्रश्न केला. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे.
नाशिक शहरातील देवळाली मतदार संघातील आमदार सरोज आहिरे या नाशिकमध्येच निवास्थानी होत्या. सकाळी राष्टÑवादीने धावपळ करून पक्षाच्या माजी नगरसेविका कविता कर्डक आणि अन्य कार्यकर्त्यांसह त्यांच्या घरी गेल्या. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला नेण्यात आले आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ आणि सरोज आहिरे मुंबईत असून दिलीप बनकर नाशिकमध्ये आहे. मात्र, कोकाटे, पवार आणि झिरवाळ नॉट रिचेबल आहेत.