शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

आॅनलाइन धान्यवाटपात नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:07 AM

नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यतील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदीड लाख शिधापत्रिकाधारकांना आॅनलाइनप्रणालीत आणण्यासाठी काय करता येईल यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.

नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यतील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे.आॅनलाइन धान्य वाटपात राज्यातील अन्य जिल्ह्णांत नाशिक जिल्ह्याचा १९वा क्रमांक असला तरी, राज्यात सर्वाधिक धान्य वाटपात नाशिकने अव्वलस्थान कायम ठेवले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रेशनवरील धान्याचे वाटप ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने वाटप केले जात असून, सध्या ज्यांचे पॉस यंत्रावर बोटांचे ठसे उमटत नाहीत किंवा ज्यांची नोंदणी झालेली नाही अशांसाठी रूट आॅफिसर नेमून त्यांना धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक आहे.  त्यातील सहा लाख ८ हजार ८४१ शिधापत्रिकाधारकांना गेल्या महिन्यात आॅनलाइन धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्यात धान्य वाटपाचे मंजूर नियतानाचा विचार करता, १६,५०० मेट्रिक टन इतके धान्य आॅनलाइन वाटप करून नाशिक जिल्ह्णाने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आॅक्टोबर महिन्यात उर्वरित दीड लाख शिधापत्रिकाधारकांना आॅनलाइनप्रणालीत आणण्यासाठी काय करता येईल यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.