नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे जानेवारी महिन्यातील अंतिम सर्वेक्षणानंतर ही कामगिरी सुधारल्यास पहिल्या दहामध्ये नाशिकचा समावेश होऊ शकतो.केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेअंतर्गत स्पर्धा घेण्यात येते. आत्तापर्यंत तीन वर्षे झाली असून, त्यात पहिल्या वर्षी महापालिकेचा क्रमांक ३३वा त्यानंतर दुसऱ्या वर्षी ६२ आणि तिसºया वर्षी ६७ वा आला आहे.देशपातळीवरील महापालिकेची कामगिरी घसरली असली तरी प्रशासनाने स्वच्छतेबाबत विविध योजना राबवून लोकसहभागदेखील वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने दरवर्षी सर्वेक्षण करण्याच्या निकषात बदल केले असून, दर तीन महिन्यांनी केंद्र शासनाचे पथक प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे मूल्यमापन करीत असते. त्यानुसार एप्रिल ते जून या पहिल्या टप्प्यातील मूल्यमापनात नाशिक शहराचा देशात चौथा क्रमांक आला. इंदूर शहराचा प्रथम क्रमांक असून दुसºया क्रमांकावर भोपाळ आणि तिसºया क्रमांकावर सुरत शहर होते. दुसºया तिमाहीत नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला असून, तो सातवा आहे. इंदूर शहराचा पहिला, राजकोटचा दुसरा, नवी मुंबईचा तिसरा, वडोदराचा चौथा, भोपाळचा पाचवा, अहमदाबाद शहराचा सहावा क्रमांक आहे. गेल्या दोन वर्षात ६२ आणि ६७ या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदा मात्र लक्षणीय सुधारणा केली असून, त्यामुळे अंतिम चरणातदेखील महापालिकेचा क्रमांक असाच राहिल्यास टॉप टेनमध्ये नाशिकचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक टॉप टेनमध्ये येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 1:54 AM
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे जानेवारी महिन्यातील अंतिम सर्वेक्षणानंतर ही कामगिरी सुधारल्यास पहिल्या दहामध्ये नाशिकचा समावेश होऊ शकतो.
ठळक मुद्देकामगिरी सुधारली : आता जानेवारीतील निकालाकडे लक्ष