नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू कऱण्यात आलेल्या संचार बंदीमुळे मुंबई व नाशिक च्या दिशेने येणारी मालवाहू वाहने आडगाव ट्रक टर्मिनल्स अणि शिदे गाव टोलनाक्याच्या परिसरात अडकली आहे. त्यामुळे या ट्रकचालकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गूड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने गेल्या सोमवारपासून घराघारतून खाद्यपदार्थ जमा करून ट्रकचालकांच्या जेवनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असून यापुढील काळात संसर्ग टाळण्यासाठी या सर्व ट्रकचालकांना २० दिवसांचा किराणा माल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती नाशिक ट्रान्सोपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव तालुक्यांसह धुळे, जळगाव,पुणे, अहमदनगर, औरंगाबाद जिल्हे व देशातील वेगवेगळ््या राज्यातून नाशिक व मुंबईच्या दिनेने रोज हजारोंच्या संख्येने वाहने धावतात. परंतु, संचार बंदीमुळे रस्त्यात असलेली देशभरातून आलेली ही मालवाहू वाहने शहर परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव ट्रक टर्मिनल व नाशिक- पुणे महामार्गावरील शिंंदे टोलनाच्या परिसरात उभी आहेत. संचारबंदीमुळे या सर्व ट्रकचालक व त्यांच्या सहकार्यांच्या उदरनिर्वाचा प्रश्न ओळखून नाशिक ट्रोन्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गूड्स ट्रान्सोपोर्ट असोसिएशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्यान समीती यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी त्यांच्या परिसरातून विविध खाद्यपदार्थ जमाकरून सोमवारी सुमारे साडेचारशे, मंगळवारी साडे अकराशे व बुधवारी सुमारे एक हजार ट्रकचालकांना जेवनाचे डब्बे पुरविण्याचे काम केले. परंतु, याकाळात खाद्यपदार्थांचे संकलन करणाºया स्वयंसेवक आणि ट्रक चालकांच्या संपर्कातून कोरोनाचा संपर्क होण्याचा धोका ओळखून या तिन्हिी संघटनांनीमिळून गुरुवारपासून या ट्रकचालकांना २० दिवस पूरेल एवढे किराणा साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाशिक ट्रोन्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न संपूर्ण भारतात लॉकडाऊन असला तरी वाहतूक व्यावसायिक जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासाठी कार्यरत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटाच्या परिस्थिती वाहतूक व्यावसायिक सरकारसोबत असून नाशिक परिसरात अडकलेल्या ट्रक व ट्रक चालकांना जनकल्यान समीती, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. -राजेंद्र फड , अध्यक्ष नशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन