लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : जिल्हा प्रवेशबंदी लागू करण्यात आल्यानंतर नाशिक - पुणे महामार्गावर कऱ्हे घाटात तर सिन्नर - शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ वावी पोलिसांनी तपासणी नाके सुरू केले आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एस. बी. कोते यांनी जिल्हा हद्दीवर तपासणी नाक्यांचे नियोजन केले आहे. एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांची एका तपासणी नाक्यावर समावेश आहे. हे तपासणी नाके २४ तास कार्यरत राहणार आहेत.
या ठिकाणाहून मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक त्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहेत. विनाकारण जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना माघारी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक कोते यांनी दिली. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
फोटो - २३ सिन्नर नाकाबंदी
नाशिक - अहमदनगर जिल्हा हद्दीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व पोलीस कर्मचारी.
===Photopath===
230421\23nsk_7_23042021_13.jpg
===Caption===
फोटो - २३ सिन्नर नाकाबंदी नाशिक -अहमदनगर जिल्हा हद्दीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व पोलीस कर्मचारी.