येवला(नाशिक) : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवल्यापासून वैजापूरच्या दिशेने 18 किमी अंतरावर असणाऱ्या रास्तेसुरेगाव ते खामगांवपाटी जवळील धोकादायक वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.वैजापूरच्या दिशेकडून डिस्कवर कंपनीची मोटरसायकल (क्रमांक एम एच 15-डी ई 4127) वरुन दोन युवक अलीम कालू पठाण (वय 35 वर्ष )राहणार कौठखेडे, व शशिकांत दोंडाजी मगर (वय 30 वर्ष ) राहणार गारखेडे हे दोघेजण येवल्याकडे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.या धड्केत दोघे जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी दिली.या घटनेचे वृत्त समजताच पोलीस मदतीला धावले.परंतु धडक जोरदार असल्याने दोघे युवक वाचू शकले नाहीत.या धोकादायक वळणावर कायम अपघात होतात.परंतु सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप धोकादायक वळण असा फलक लावू शकले नाही.नेमक्या कोणत्या अज्ञात वाहनाने धडक दिली या प्रकरणी पोलीस नाईक पाटोळे तपास करीत आहेत.या प्रकरणी अज्ञात वाहन चालक विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिक: येवला-वैजापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोन तरूण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 11:20 AM