गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी वणवण सुरू आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालये, कोविड सेंटर आदी ठिकाणी पन्नास हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथील रुग्णांवरील उपचारासाठी शासनाकडून केवळ ७५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असून, नाशिकसाठी १०५ मेट्रिक टन दररोज ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात गोडसे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑक्सिजनची वाढीव मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून नाशिकसाठी दररोज १०० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा आरक्षित करून वितरण करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
नाशिकला मिळणार दररोज १०० मेट्रिक टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:15 AM