शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

महिलांच्या कला विकासासाठी झटणारी  नाशिक महिला महारांगोळी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:27 AM

नववर्ष स्वागत यात्रा समिती अंतर्गत नाशिक महिला महारांगोळी विभाग गत तीन वर्षांपासून रांगोळी व इतर अनेक उपक्रमांद्वारे महिलांच्या कला ...

नववर्ष स्वागत यात्रा समिती अंतर्गत नाशिक महिला महारांगोळी विभाग गत तीन वर्षांपासून रांगोळी व इतर अनेक उपक्रमांद्वारे महिलांच्या कला संवर्धनासाठी परिश्रम घेत आहे. पहिल्या वर्षी केवळ ५० ते ६० महिला सदस्य असणाऱ्या या ग्रुपला आज ५००हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. वर्षभरात विविध सण, जयंती, उत्सवांना रांगोळी सेवा देण्याचे काम ग्रुपमधील सदस्य करत आहेत. ग्रुपमध्ये नव्याने सदस्य होणाºया महिलांना बिंदूपासून मोठी रांगोळी रेखाटण्यापर्यंत सविस्तर प्रशिक्षण दिले जाते. ग्रुपमधील महिलांना ऐक्य, समता, बंधूता, तप्तरता ही मूल्ये काम करताना नकळतपणे शिकायला मिळतात. यातून त्यांची कला विकसित होतेच पण त्या स्वतंत्रपणे काम करून अर्थार्जनही करू शकतात. ग्रुपने मागील नवरात्रात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या अंगणात आकर्षक महारांगोळी रेखाटण्यात आली होती. नऊ दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत रविवार कारंजावरील व्यापारी मंच यांच्या विनंतीनुसार वही पूजनाची मोठी आणि सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली होती. पंढरपूर यात्रेसाठी पंढरपूरला जाऊन आलेल्या शेगावच्या पालखीचे स्वागत शेगाव येथे या ग्रुपने रेखाटलेल्या रांगोळीने केले जाते. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या ग्रुपमधील सदस्यांचे एकमेकींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. ग्रुपमध्ये निरनिराळ्या कार्यशाळा, प्रशिक्षण, स्रेहसंमेलन आयोजित केले जाते. पाडव्याच्या दिवशी गंगेवर तसेच शहरात ८ ते १० ठिंकाणी महारांगोळी रेखाटली जाते. याशिवाय त्रिपुरी पौर्णिमा, महावीर जयंती, गणेशोत्सव, रामनवमी, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा सर्वच सण-उत्सवांना रांगोळीसेवा दिली जाते. महिलांमध्ये कलेचा विकास कसा होईल, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्रुपमधील सदस्यांना विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे सूचना पोहोचविल्या जातात. कार्यक्रमांची आगाऊ माहिती दिली जाते.गु्रपमध्ये आसावरी धर्माधिकारी, वीणा गायधनी, भारती सोनवणे, अमी छेडा, मयना रुईकर, सुचिता हुदलीकर, मंजुषा नेरकर, अनुराधा शेटे, प्राची परदेशी आदी कार्यकर्त्या सक्रिय सहभाग देत आहेत.

टॅग्स :WomenमहिलाSocialसामाजिक