नाशिक : युवक कॉँगे्रसच्या विधानसभा मतदार संघ प्रमुख ते प्रदेशाध्यक्ष निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला असून, नाशिक शाहराध्यक्षपदी स्वप्नील पाटील यांची तर जिल्हाध्यक्षपदी दिनेश चोथवे यांची दणदणीत मतांनी निवड झाली आहे. जिल्हा महसचिवपदी गौरव पानगव्हाणे हे निवडून आले आहेत.गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय युवक कॉँग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी मतदान घेण्यात आल्यावर आज प्रदेश पातळीवरून या निकालांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक लोकसभा मतदार संघात ४५०० तर ग्रामीण जिल्ह्यात ५२०० मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदाराला पाच मते देण्याचा अधिकार होता. त्यात विधानसभा मतदार संघ प्रमुख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिवांचा समावेश होता. गुरूवारी दुपारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेस भवनासमोर जोरदार जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत नाशिक शहराध्यक्षपदी स्वप्नील पाटील (१५८७) तर उपाध्यक्षपदी जयेश पोफळे (१६४) मतांनी निवडून आले. मध्य विधानसभा मतदार संघ प्रमुखपदी जयेश सोनवणे (५००), उपाध्यक्षपदी आकाश घोलप (१९९) हे निवडून आले. पुर्व विधनसभा मतदार संघ प्रमुखपदी रोहन कातकाडे (१३०), देवळाली मतदार संघ प्रमुखपदी ज्ञानेश्वर गाडे (१९२) व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघ प्रमुखपदी दिलीप मुळाणे (७००) हे विजयी झाले.ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिनेश चोथवे (१३८३)मतांनी निवडून आले. उपाध्यक्षपदी कल्याणी रांगोळे (८२१), प्रिती कोठावदे (३३६) यांची निवड करण्यात आली. जिल्हा महासचिवपदी गौरव राजाराम पानगव्हाणे (७००) मतांनी निवडून आले. सचिवपदी धनंजय कोठूळे, प्रशांत पगार, त्रिरश्मी तिगोटे यांची निवड करण्यात आलाी. निफाड विधानसभा प्रमुखपदी सचिन खताळे (७१), नांदगावी हरेश्वर सुर्वे (१५०), मालेगाव बाह्य संदीप निकम (६१), कळवण अतुल पगार (१७६), चांदवडला स्वप्नील सावंत (२५१) मतांनी निवडून आले आहे.या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून शहरासाठी प्रशांत चक्रवर्ती व ग्रामीणसाठी लोकेश तिवारी या दिल्लीच्या निरिक्षकांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, आमदार निर्मला गावीत, डॉ. शोभा बच्छाव, राहूल दिवे, भारत टाकेकर आदींनी प्रकियेवर लक्ष ठेवून मार्गदर्शन केले.
नाशिक युवक कॉँग्रेसच्या निवडणुकीचे निकाल जाहीर
By श्याम बागुल | Published: September 13, 2018 5:42 PM
गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय युवक कॉँग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी मतदान घेण्यात आल्यावर आज प्रदेश पातळीवरून या निकालांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक लोकसभा मतदार संघात ४५०० तर ग्रामीण
ठळक मुद्देशहराध्यक्षपदी पाटील; जिल्हाध्यक्षपदी चोथवे यांची निवडमतदार संघात ४५०० तर ग्रामीण जिल्ह्यात ५२०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.