शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कसारा घाटातील अपघातात नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 3:00 PM

पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

शाम धुमाळ 

नाशिक : पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिक येथील उद्योजक तरुण पवन रामचंद्र मोरे वय 47 व त्यांचे मित्र नरेंद्र पाटील हे आपले काम आटपून मुबई हून नाशिक कडे जात असताना  कसारा घाटातील नागमोडी वळणा वर गाडी चालवत असलेले नरेंद्र पाटील यांच्या कडून गाडी वरील ताबा सुटला व गाडी घाटातील नाल्यात अडकली गाडीचे चालकाच्या बाजूकडील भाग नाल्यात अडकल्याचे लक्षात येताच चालकाच्या बाजूला बसलेले पवन मोरे यांनी गाडीच्या खाली उतरून गाडी काढण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का याची खातर जमा केली.

अशातच पुन्हा गाडीत बसण्यासाठी वळत असतानाच रात्रीच्या अंधारात व धुक्यात एका अज्ञात वाहनाने आपघातग्रस्त गाडीला धडक देत गाडीत बसण्यासाठी निघालेल्या पवन मोरे यांना जोरदार धडक दिली. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे पवन मोरे हे जागीच मयत झाले तर त्यांचे सहकारी मित्र नरेंद्र पाटील यांना सुदैवाने काहीही दुखपत झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस, महामार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले व मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू