शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:53 AM

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू असलेल्या प्रयोगाचा विचार करता, सेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असली तरी, विद्यमान अध्यक्षदेखील या पदावर पुन्हा दावा करू शकतात.

ठळक मुद्देसर्वपक्षीयांच्या आशा पल्लवित; तयारीस प्रारंभ

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू असलेल्या प्रयोगाचा विचार करता, सेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असली तरी, विद्यमान अध्यक्षदेखील या पदावर पुन्हा दावा करू शकतात.नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे.त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजता या आरक्षणाची माहिती जिल्हा परिषदेत येऊन धडकताच इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या शिवसेनेची असून, त्याखालोखाल राष्टÑवादी व भाजपची आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सेना व भाजपमध्ये झालेला दुरावा तसेच कॉँग्रेस, राष्टÑवादीची सेनेशी होत असलेले सख्य पाहता राज्यात महाशिव आघाडी अस्तित्वात आल्यास अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहील. (पान ५ वर)राष्टÑवादी, कॉँग्रेसकडे उपाध्यक्षपद तसेच सभापतिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याचीही शक्यता असून, त्यासाठी आगामी काळात राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सेनेतच इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या असून, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांच्या नावांची चर्चा होत असली तरी, सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद खुले झाल्याने या पदासाठी कोणत्याही प्रवर्गातील सदस्य दावा करू शकतो. त्यामुळे भास्कर गावित या आदिवासी सदस्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. गेल्या अडीच वर्षांतील कार्यकाळातील जवळपास वर्षभर विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमध्येच वाया गेल्याने व उर्वरित काळात जिल्हा परिषदेचा गाडा चांगला हाकल्यामुळे विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे यांना पक्षश्रेष्ठींनी ठरविले तर पुन्हा संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. शिवसेनेला एकट्याच्या बळावर अध्यक्षपद मिळणे अशक्य असल्यामुळे महाशिव आघाडीचा प्रयोग झाल्यास विषय समित्यांच्या सभापतिपदासाठीही सेनेच्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक