शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नाशिक जिल्हा परिषदेची प्रोेजेक्ट सिस्टीम राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 1:59 AM

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणारी देखभाल, दुरुस्तीच्या कामांची नोंद आॅनलाइन पद्धतीने घेण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीचा वापर आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, तसा आदेश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणारी देखभाल, दुरुस्तीच्या कामांची नोंद आॅनलाइन पद्धतीने घेण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीचा वापर आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, तसा आदेश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे.बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागात विकासकामे केली जातात. या कामांचे अंदाजपत्रके, निविदा व प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम सुरू झाल्यानंतर झालेल्या कामांचे मोजमाप व त्याच्या नोंदी आॅनलाइन ठेवल्या जातात. त्यानंतर ठेकेदारांनी त्यांची देयके आॅनलाइन पद्धतीने सादर करून त्याच्या आधारेच देयके अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली विकसित केली आहे. याप्रणालीमुळे बांधकाम विभागाचे कामकाज पारदर्शी व जलदगतीने होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रणालींतर्गतच कामे केले जात असताना नाशिक जिल्हा परिषदेने दिवाळीपूर्वी राज्याचे प्रधान सचिव आसिमकुमार गुप्ता यांच्या समोर मंत्रालयात सदर प्रणालीचे सादरीकरण केले होते. गुप्ता यांनी सदर प्रणालीमुळे बांधकाम खात्याचे कामकाजात सुधारणा होणार असल्याने तिला मान्यता दिली. मात्र या प्रणालीतून काढण्यात आलेली प्रिंटआउट मोजमाप पुस्तिकेत (एमबी) चिटकवावी लागत होती. त्यामुळे वेळेचा व कागदाचा अपव्यय होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने गुप्ता यांनी या संदर्भात काढलेल्या शासन आदेशात आता बदल केला आहे. पीएमएसप्रणालीतून काढलेली प्रिंट मोजमाप पुस्तिकेला न जोडता, त्याऐवजी सदर प्रिंट शाखा अभियंता, उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांनी मोजमापांची अंतिम तपासणी केल्यानंतर विभागीय स्तरावर काढण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे पीएमएसमध्ये कोणत्या अभियंत्याने हा डेटा सिस्टीममध्ये भरला आहे, त्याची ओळख सिस्टीममधून उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीएमएसमध्ये नोंदणी करतेवेळी जो नंबर असेल त्यालाच मोजमाप पुस्तिकेचा क्रमांक संबोधण्यात यावे त्याचबरोबर प्रत्येक पानावर शाखा अभियंता व उपअभियंता यांची डिजिटल स्वाक्षरी असावी. तसेच कार्यकारी अभियंता यांची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत मानन्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. या कामी कार्यकारी अभियंता खैरनार, कार्यासन अधिकारी नितीन पाटील, पीएमएसचे राज्य नोडल अधिकारी ऋषीकेश गरुड, आर. एन. पाटील, कुंदन ठाकूर यांनी सादरीकरण केले होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार