नाशिक: आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशप्रक्रियेस बुधवार (दि.१२) पासून प्रारंभ झाला असून गेल्या दहा दिवसात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या ९३६१ इतकी झाली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ४४७ शाळांमधील ५५५३ जागांसाठी सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी केवळ ३८ पालकांनी अर्ज सादर केले होते. त्यानंतर मात्र अर्ज दाखळ करणाऱ्यांची संख्या वाढली असून गेल्या दिवसात गती अधिक वाढली आहे. शनिवार आणि रविवार अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढत असल्याने येत्या दोन दिवसात अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ९ हजाराच्या पुढे अर्ज आॅनलाईन नोंदविण्यात आली.शहर परिसरात आरटीई प्रवेशासाठी पालकांनी सायबर कॅफेवर गर्दी केली असल्याने अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे पालकांना अर्ज दाखल करता आले नाही. सर्व्हरचा किरकोळ उपवाद वगळता कुठेही आॅनलाइन प्रक्रियेसाठी अडचण निर्माण झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आॅनलाइन आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातूनदेखील पालकांना प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.
आरटीईसाठी ९ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 9:34 PM