नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर केरळ सरकारकडून केल्या जाणाºया हिंसाचाराविरोधात ११ नोव्हेंबरला केरळची राजधानी तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाशिक जिल्ह्यातून ९ नोव्हेंबरला सुमारे दोनशे विद्यार्थी जाणार आहेत़ तत्पुर्वी नागरिकांना केरळमध्ये अभविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया हिंसाचाराची माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी मंगळवारी (दि़३१) संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशसहमंत्री शुभम अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली़अग्रवाल यांनी सांगितले की, केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या शेकडो कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत़ विशेष म्हणजे माकपाची सत्ता आल्यापासून या हल्ल्यामध्ये वाढ झाली असून मुख्यमंत्री पिनरायी विजयान यांच्या क्षेत्रात कन्नूरमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात आले आहे. केरळमध्ये अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची पायमल्ली होत असून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २००० ते २०१७ या कालावधीत ८२ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत़अभाविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया या हल्ल्यांच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबरला केरळच्या राजधानीत देशभरातील सुमारे ५० हजार कार्यकर्ते शांतीमोर्चा काढणार आहे़ तत्पुवी जनजागृतीसाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अशोकस्तंभावर निदर्शने केली जाणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले़ यावेळी नाशिक महानगरमंत्री सागर शेलार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़
केरळ सरकारविरोधात अभाविपची मंगळवारी महाराष्ट्रभर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:42 PM
नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर केरळ सरकारकडून केल्या जाणाºया हिंसाचाराविरोधात ११ नोव्हेंबरला केरळची राजधानी तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाशिक जिल्ह्यातून ९ नोव्हेंबरला सुमारे दोनशे विद्यार्थी जाणार आहेत़ तत्पुर्वी नागरिकांना केरळमध्ये अभविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया हिंसाचाराची माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी मंगळवारी (दि़३१) संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने ...
ठळक मुद्देपत्रकार परिषद : अभविपच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचारअभिव्यक्ती स्वांतत्र्यांची पायमल्ली ; ११ नोव्हेंबरला तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चा