नाशिक: जनआरोग्य योजनेतंर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत करण्यात येणार आहे, असे असतांनाही रूग्णालयांनी मोफत उपचार करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. दरम्यान, या व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी घटना व्यवस्थापकाची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी लागणारी अँटी फंगल आणि एम्फोटेरीसिन बी इंजेक्शन ही औषधे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालयांना मोफत पुरविण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. सदर योजना ही कॅशलेस पद्धतीने राबविली जात असून योजनेचा लाभ घेण्याकरिता रुग्णालयात रुग्णांस भरती करतेवेळी कोणतेही रेशन कार्ड व आधारकार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे व ती कागदपत्रे रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याकडे सादर करावित, असे जिल्हाधिकारी आवाहन मांढरे यांनी केले आहे. कागदपत्रे रूग्णालयात दाखल होताना उपलब्ध नसल्यास रुग्णालयास तशी कल्पना व लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन योजनेचा लाभ मिळविता येऊ शकतो. सदरील कागदपत्रे निर्धारीत कालावधीत जमा करणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील "आरोग्यमित्र" अथवा तक्रार क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे . मात्र या योजनेअंतर्गत कोरोना उपचाराच्या अनुषंगाने लागणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश करण्यात आलेला नाही, याची रुग्ण आणि नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले आहे.
जनआरेग्यातून म्युकरमायकोसिसचा उपचार न केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 3:54 PM
नाशिक : जन आरोग्य योजनेतंर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत ...
ठळक मुद्देिजल्हाधिकारी : जिल्ह्यातील आठ रूग्णालयांत मोफत उपचार