सदाभाऊ खोत: पंचनामे गतीमान करण्यासाठी शासनाचा निर्णयनाशिक: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे गतीमान करण्यासाठी कृषी महाविद्यालयीतील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषरी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी खोत यांनी केली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहाणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री खोत हे जिल्हा दौºयावर असून त्यांनी शुक्रवारी सटाणा आणि निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहाणी केली. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष,कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांना या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरण्यासाठी येत्या आठ दिवसात सर्व पीकांचे पंचनामे करण्यात येतील. पंचनाम्याचे काम अधिक गतीने होण्यासाठी ग्रामविकास, महसूल, कृषी विभागाबरोबरच कृषी विभागाबरोबरच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी शाासनस्तरावर निर्र्णय घेण्यात आल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.बागलाण तालुक्यातील वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज मागणीचा विचार करता निर्यात सुविदा केंद्र लवकरच सुरू करण्यासाठी व डाळींब, द्राक्ष, पिकाला रोजगार हमीतून अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पीक पंचनाम्यासाठी कृषी महाविद्यालयांचीही मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 7:26 PM