एकलहरे: कोटमगाव येथे आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते पुरबाधितांना मदतीचे वाटप करण्यात आले पुराचे पाणी घरात शिरून ज्यांचे नुकसान झाले होते अशा पूरग्रस्त बाधितांना मदत निधीचे वाटप करण्यात आले.कोटमगाव ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते. यावेळी अतिव्रुष्टिमुळे नुकसान झालेल्या कमल काशिनाथ गोसावी, इंदुबाई बबन घुगे, अंजनाबाई पंढरीनाथ म्हस्के, लक्ष्मण खंडू म्हस्के, महादेव पुंजाजी घुगे, चंद्रभान विश्वनाथ म्हस्के, रमेश गोविंद घुगे यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश आमदार आहिरे यांच्या हस्ते देण्यात आला.सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी गावच्या विविध विकास कामाचे प्रस्ताव दिले. समनागाव कोटमगाव मुख्य रस्त्याचे रुंदीकरण, दरणा नदीच्या पुरामुळे बंद होणारी वाहतूक सुरू राहण्यासाठी दोन तीन ठिकाणी रस्त्याला उंची द्यावी, नवीन शाळेची इमारत, आरसीसी स्मशानभूमी, गावात व मळे विभागात घर तिथं शुद्ध पाण्याचा नळ योजना प्रस्तावित असून त्याचा पाठपुरावा करणे, मळे विभागात सोलर लाईट बसविणे, सर्व मळे विभागातील रस्ते डांबरिकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण करणे इत्यादीचे निवेदन देण्यात आले.
कोटमगाव येथे पुरबाधितांना मदतीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 4:43 PM