नाशिक : एटीएम कार्ड ब्लॉक झाले असून, ते सुरू करण्याच्या नावाखाली एटीएम कार्ड व ओटीपी याची सर्व माहिती विचारून आॅनलाइन पद्धतीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून २ लाख १९ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना आडगाव परिसरात घडली आहे़
राजाराम माळोदे (रा़ दिवटे वस्ती, आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ ते ९ जुलै या कालावधीत संशयित राहुल शर्मा याने आपल्या ८३३५०८१८१२ या क्रमांकाच्या मोबाइलवरून संपर्क करून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले असून, ते पुन्हा सुरू करून देतो, असे सांगितले़ यानंतर माळोदे यांच्याकडून एटीएम कार्डनंबर, पिन अशी सर्व माहिती विचारून घेतली़
यानंतर माळोदे यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियातील ३१२७३७५६२८२ या क्रमांकाच्या खात्यातून २ लाख १९ हजार ९९२ रुपये आॅनलाइन पद्धतीने पेटीएमद्वारे काढून घेतले़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़