शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

माता सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 7:17 PM

माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे पती परस्पर काढून घेत असल्यामुळे या योजनांचे आर्थिक लाभ आता बॅँकेत न जमा करता टपाल खात्यात जमा करण्याचा सल्ला शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देपत्नीचा अंगठा किंवा सही करून रक्कम परस्पर काढली जाते.योजनांचे आर्थिक लाभ आता बॅँकेत न जमा करता टपाल खात्यात जमा करण्याचा सल्ला

नाशिक : माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे पती परस्पर काढून घेत असल्यामुळे या योजनांचे आर्थिक लाभ आता बॅँकेत न जमा करता टपाल खात्यात जमा करण्याचा सल्ला शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषण तसेच माता-बालकांच्या मृत्यूचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत मातांना संगोपन आणि पोषण आहारासाठी आर्थिक लाभ दिले जातात. हे आर्थिक लाभ शासनाकडून बॅँकेत जमा होत असल्याने बॅँकेतून ही रक्कम त्यांचे पती काढून घेत असल्याने या योजनांचा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी आणि अतिदुर्गम तसेच ग्रामीण भागात बॅँक असतेच असे नाही. बॅँक असलीच तर ती तालुक्याच्या ठिकाणी असते. त्यामुळे लाभार्थी  अशा परिस्थितीत बॅँकेत जाऊन पैसे काढू शकत नाही किंवा त्यांना घराबाहेर पडणे कठिण असते. त्यामुळे हे पैसे बॅँकेच्या स्लीपवर त्यांचे पतीच काढून घेत असल्याने मूळ लाभार्थी महिलांपर्यंत हे पैसे पोहचतच नाही. त्यामुळे माता-बाल संगोपनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. कित्येकता बॅँकेच्या स्लीपवर पत्नीचा अंगठा किंवा सही करून रक्कम परस्पर काढली जाते. बॅँक दूरवर असल्यामुळे पतीच्या आग्रहास्तव आणि महिलांना अशा परिस्थितीत बॅँकेत येणे शक्य नसल्यामुळे बॅँकेकडूनही फारशी अडवणूक केली जात नाही. या प्रकारामुळे मात्र मूळ लाभार्थींपर्यंत योजनेची रक्कम पोहचत नाही. त्यामुळे आता टपाल कार्यालयाचा पर्याय समोर आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद