एकलहरे : येथील औष्णिक वीज प्रकल्पाचे २१० मेगावँटचे तीनही संच २०२२ पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र नवीन प्रकल्पाबाबत काहीही निर्णय होत नाही. येथील संच बंद झाले तर एकलहरे पंचक्र ोशीतील शेतकरी, कामगार, ठेकेदार व त्यांच्यावर अवलंबून असणारे रोजंदारी मजूर, कारागिर व त्यांचे कुटुंबिय, व्यापारी या घटकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील प्रकल्प बंद केल्यास ग्रामस्थ निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा इशारा: राष्ट्रवादीच्या बैठकीतील निर्णयच्या बैठकीत देण्यात आला.अखिल भारतीय समता परिषदच्यावतीने आयोजित बैठकीत अध्यक्ष शानु निकम यांनी याप्रकरणी आक्रामक भुमिका घेतली जाणार असल्याचे सांगितले. येथील तीनही संचांचे नुतनीकरण व आधुनुकीकरण करु न त्यांचे आयुर्मान १० ते १५ वर्षे वाढवावे. दरम्यानच्या काळात नविन प्रकल्पासाठी प्रयत्नशील राहावे.तसे झाले नाही तर येत्या २०१९ च्या निवडणुकांवर एकलहरे पंचक्र ोशीतील नागरिक बहिष्कार घालतील असा इशारा अखिल भारतीय समता परिषदेचे एकलहरेचे अध्यक्ष निकम यांनी दिला आहे.एकलहरे वसाहतीतील मारु ती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसची नियोजन बैठक जेष्ठ नेते निव्रुत्ती अरिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, नाशिक तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, निवृत्ती कापसे, बाळासाहेब म्हस्के, गंगाधर धात्रक, प्रशांत म्हस्के, सुनील कोथमिरे, आसाराम शिंदे, मोहन निंबाळकर, दिपक वाघ, अशोक राजोळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड म्हणाले की, एकलहरेच्या प्रकल्पाबाबत माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले आहे. येथील नविन प्रकल्पासाठी व नाशिकचे वैभव अबाधित राहण्यासाठी आपण येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारु असे आश्वासन भुजबळ यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
एकलहरे प्रकल्प बंद केला तर निवडणुकांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 2:46 PM
एकलहरे : येथील औष्णिक वीज प्रकल्पाचे २१० मेगावँटचे तीनही संच २०२२ पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. ...
ठळक मुद्देइशारा: राष्ट्रवादीच्या बैठकीतील निर्णयसंच टप्प्या टप्प्याने बंद करण्याच्या हालचाली