नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला.या स्पर्धेत १२ देशाच्या ५२ संघानी सहभाग घेतला आहे. यामध्ये आॅस्ट्रेलिया. चीन. जपान, कोरिया. चीन तैपेई, हॉंगकॉंग, मलेशिया, इंडिनेशीया, सिंगापूर, बांगला देश,आणि भारत या संघांचा समावेश आहे. स्पर्धा पुरुष गट. महिला गट, मिक्स गट, सुपर मिक्स गट आणि वरिष्ठ गट अशा पाच वेगवेगळे गटात खेळविण्यात येत आहेत.यामध्ये मिक्स डबल्स या प्रकारात भारताच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून तिसºया फेरीनंतर ३०.८० गुण मिळवून आघाडी घेतली आहे. तर सुपर मिक्स या प्रकारातही भारताच्या संघाने प्रथम फेरीपासून आघाडी कायम राखत तिसºया फेरीअखेर ३०.८० गुण मिळविले आणि या गटात प्रथम स्थान मिळविले आहे. पुरु षांच्या गटात भारताच्या संघाने दुसºया फेरीअखेर २६.४२ गुण मिळवून या गटात चौथे स्थान मिळविले होते. मात्र तिसºया फेरीत त्यांना आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. त्यामुळे भारताच्या संघ सहाव्या क्र मांकावर गेला. या गटात चीन तैपेई या संघाने सहज सुंदर खेळ करून तिसऱ्या फेरीअखेर ३६.६४ गुण मिळवून पाहिले स्थान राखले आहे.हॉंगकॉंग संघानेही चांगला खेळ करून ३०.६२ गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत प्रथम तीन दिवस सर्व गटाच्या साखळी पद्धतीच्या स्पर्धा होणार असून. या साखळी स्पर्धेतील संघांच्या कामिगरीच्या आधारे प्रत्येक गटातून पहिले चार संघ बाद पद्धतीच्या सामन्याकरीता पात्र ठरणार आहेत अशी माहिती या स्पर्धेचे प्रमुख सूत्रधार आनंद सामंत यांनी दिली.
आशियाई ब्रिज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाची आघाडी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 4:27 PM
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला.
ठळक मुद्देस्पर्धेत १२ देशाच्या ५२ संघानी घेतला सहभाग तिसऱ्या फेरीअखेर ३६.६४ गुण मिळवून पाहिले स्थान