पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला.नाशिक पाठोपाठ पुणे, खेड, मंचर या भागांतील स्थानिक कोथिंबीर माल बाजार समितीत दाखल होत असल्याने तसेच कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली आहे. आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. कोथिंबीरचे बाजारभाव घसरल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना आपला माल परत न्यावा लागला. गेल्या डिसेंबरमध्ये कोथिंबरच्या भावाने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. कोथिंबरची आवक मर्यादीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला होता. जानेवारीतही चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळू शकला नाही.कोथिंबीर पाठोपाठ शेपू भाजीचे दरही घसरले आहेत. शेपू ४०० रुपये शेकडा दराने विक्री झाली. मेथीची आवक मध्यम असून, मेथीला मागणी असल्याने बाजारभाव टिकून आहेत. सोमवारी सायंकाळी लिलावात मेथीला एक हजार रुपये शेकडा बाजारभाव मिळाला तर पालेभाज्यांत कांदापातच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. कांदापातला ग्राहकांकडून मागणी कायम असल्याने बाजारभाव टिकून आहेत. कांदापातच्या प्रति जुडीला १४ ते २२ रुपयापर्यंत लिलावात बाजारभाव मिळत आहे.--इन्फो बॉक्स---शेतमालाली पोषक वातावरणसध्या सर्वत्र थंडीचा जोर वाढलेला असला तरी काही पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले असल्याने आवक वाढली आहे. कोथिंबीर मालाला पोषक वातावरण असून, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील बाजार समितीत कोथिंबीरची आवक वाढली असल्याने कोथिंबीरचे दर घसरले आहेत. सोमवारी बाजार समितीत कोथिंबीर २ ते १२ रुपये जुडी दराने विक्र ी झाली आहे.-नितीन लासुरे, व्यापारी
कोथिंबीर जुडीला अवघा दोन रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 9:46 PM
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला.
ठळक मुद्देकोथिंबीर बाजारभाव घसरले : आवक वाढली कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली