नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कार्यालयांची कामे सुरू होती.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत चालू आठवड्यात केंद्र शासनाची समिती जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ आॅगस्टपासूनच विविध उपक्र म राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनाही जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे.रविवार सुटीच्या दिवशी मुख्य कार्याकारी अधिकाºयांसह सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरीय खातेप्रमुख, प्रत्येक गावासाठी नेमलेले संपर्क अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना भेटी देऊन सर्व कामांची पाहणी करून विविध सूचना केल्या. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने ग्रामपंचायतीमधील परिसर स्वच्छ करण्यात येत असून, भिंतींवर स्वच्छता संदेश रंगविण्यात आले आहेत. शाळा. अंगणवाडी, आठवडे बाजाराचा परिसर, मंदिर परिसर यासारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहेत.जिल्ह्यात पहिल्यांदा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी येथील शौचालयांची स्वच्छता करण्यात आली असून, स्वच्छ केलेल्या सर्व स्वच्छतागृहांचे फोटो स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते बघत असून, अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना तत्काळ सूचना देण्यात येत आहेत. रविवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी निफाड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी येवला व नांदगाव, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या इतर खातेप्रमुखांनीही त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीत भेटी दिल्या. आज अनेक गावांत आठवडे बाजार असल्याने तेथेही स्वच्छ सर्वेक्षणाबाबत तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.
सुटीच्या दिवशीही जिल्ह्यात स्वच्छतेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 9:54 PM
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : गावागावांतील कामांचा अधिकाऱ्यांकडून आढावाजिल्ह्यात १ आॅगस्टपासूनच विविध उपक्र म