नाशिक : लघुपाटबंधारे विभागात जमीन गेलेल्या तक्रारदाराकडून प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करून स्वीकारणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़ राहुल बाबुसिंग राठोड असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराची लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात जमीन गेलेली आहे़ त्यामुळे त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी अर्ज केला होता़ या कार्यालयातील लिपिक संशयित राहुल बाबुसिंग राठोड याने या दाखल्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीवरून सोमवारी (दि़४) पुनर्वसन शाखेत सापळा लावला होता़ लिपिक राठोड याने कार्यालयाच्या व्हरांड्यात तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताच रंंगेहाथ पकडण्यात आले़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़संपर्क साधाशासकीय कार्यालयांमधील अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर त्याची तक्र ार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालयाशी संपर्क साधावा.- पंजाबराव उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी लाच मागणाºया लिपिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:41 PM
नाशिक : लघुपाटबंधारे विभागात जमीन गेलेल्या तक्रारदाराकडून प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करून स्वीकारणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़ राहुल बाबुसिंग राठोड असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराची लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात जमीन गेलेली ...
ठळक मुद्देचार हजार रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत