नाशिक: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाऱ्या अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पाहाणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या.नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या अंबड येथील गुदामात होणार आहे. येत्या २३ मे रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मांढरे आणि पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी संयुक्तरित्या मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला. मतदान केंद्रातून येणाºया मतपेट्यांची वाहतूक, पार्कीग, मतमोजणी यंत्रे ठेवण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. या ठिकाणी करण्यात येणाºय अद्ययावत इंटरनेट व्यवस्था, साईडस्क्रीन, ध्वनीक्षेपक, गुदामाच्या आजुबाजूचा परिसर, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीची व्यवस्था याचाही उभयतांनी आढावा घेतला.मतमोजणी केंद्र पाहाणीच्यावेळी अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरिक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चोघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जून, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थवील आदि अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 6:57 PM