शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विजेचे खांब हटविण्यास महापालिकेकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 7:08 PM

महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडीने कार्यवाही केली आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा दावा : मंजुरी देऊनही कार्यवाही नाहीखांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेची

नाशिक : महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडीने कार्यवाही केली आहे. महावितरणने दीड वर्षांपूर्वी खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी व कामासाठीचे कोटेशन दिले. सादर काम महापालिकेकडून प्रलंबित असून, महावितरणने या कामाबाबतची कार्यवाही पूर्वीच पूर्ण केल्याची माहिती नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली.कॅनॉलरोडचे रंदीकरणामुळे पूर्वी रस्त्याच्या बाजूला असणारे विजेचे खांब रस्त्यात आले आहेत. याठिकाणी ११/३३ किलोव्होल्टच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत. महापालिका हद्दीत नवीन रस्त्याचे काम किंवा रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यात येणाऱ्या वीज वाहिन्या व खांब महापालिकेकडून स्वखर्चाने रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येतात. त्यानुसार कॅनॉलरोडच्या रुंदीकरणाचे काम झाल्यानंतर महापालिकेने महावितरणच्या नाशिक शहर उपविभागीय कार्यालयाकडे दि. १६ जुलै रोजी स्वखर्चाने वीज वाहिन्या स्थलांतरित करण्याबाबतचा अर्ज केला.महापालिकेकडून प्राप्त अर्जानुसार उपविभागीय कार्यालयाने तिन्ही वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रक तयार केले. विभागीय कार्यालयामार्फत कामाचे अंदाजपत्रक मंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आले. मंडळ कार्यालयाने तिन्ही अंदाजपत्रकांना अनुक्र मे १२ व १९ सप्टेंबर आणि २९ आॅक्टोबर रोजी मंजुरी दिली. विभागीय कार्यालयाकडून मंजूर कामाचे कोटेशनही त्याचवेळी देण्यात आले. वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महावितरणने आपल्या स्तरावरील कार्यवाही त्याचवेळी तातडीने पार पाडली असून, पुढील कार्यवाही महापालिकेच्या स्तरावरून होणे आवश्यक असल्याचे थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण