नाशिक : महाराष्टÑातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेला डीबीटीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात एकाच दिवशी सर्व प्रकल्प कार्यालयांवर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असून, यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि निवासाची व्यवस्था करण्याचे घटनात्मक काम आदिवासी विभागानेच करणे अपेक्षित आहे. मात्र राज्य घटनेने दिलेल्या हक्क अधिकाराची कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. डीबीटी प्रकरणावरून राज्यभर आंदोलने झाली. मात्र अजूनही विद्यार्थ्यांच्या हाती काहीही पडलेले नाही. डीबीटी रद्द करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर पावसाळी अधिवेशनात कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात न आल्याने राज्यातील सर्व प्रकल्प कार्यालयांसमोर शासकीय आदिवासी मुला-मुलांच्या वसतिगृहाच्या वतीने एकाच दिवशी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक प्रकल्प कार्यालयासमोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही विद्यार्थी आणि शिष्टमंडळाने निवेदन देऊन प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आपल्या मागण्या मांडल्या.पाच एप्रिल रोजी डीबीटीचा शासन निर्णय रद्द करून शासनाच्या माध्यमातून वसतिगृहातील मेस चालविण्यात याव्यात, पायी मोर्चातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवून त्यांना डांबून ठेवणाºया पोलीस अधिकारी व विभागातील अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आले. आंदोलनात योगेश लहांगे, स्वप्नील धांडे, धनंजय कराडी, देवराम पारधी, अविनाश केंगले, अनिल गामले आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.--इन्फो--मित्तल यांनी घेतला आंदोलकांचा ‘वर्ग’डीबीटी संदर्भातील आंदोलनात वसतिगृहातील विद्यार्थी नसलेले विद्यार्थी शिरकाव करीत असल्याचे यापूर्वीच्या आंदोलनास समोर आल्याने मित्तल यांनी शिष्टमंडळाबरोबर आलेल्या काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचा चांगलाच वर्ग घेतला. काही विद्यार्थ्यांना कुठून आले असे विचारले असता त्यातील अनेक विद्यार्थी हे तालुका पातळीवर असल्याचे समोर आले. डीबीडी तालुका पातळीवर नसल्याने अशा विद्यार्थ्यांना त्यांनी बाहेर काढले. त्यातील एका विद्यार्थ्याला डीबीटी म्हणजे काय असे विचारले असता त्याला डीबीटीचा अर्थ आणि आदेशही सांगता आला नाही. त्यालाही मित्तल यांनी बाहेरचा रस्ता दाखविला.
डीबीटीच्या विरोधात प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 8:06 PM
नाशिक : महाराष्टÑातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेला डीबीटीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात एकाच दिवशी सर्व प्रकल्प कार्यालयांवर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असून, यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला ...
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : राज्यात एकाच दिवशी आंदोलनमित्तल यांनी घेतला आंदोलकांचा ‘वर्ग’