नाशिक : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून मदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच मागणा-या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि़१०) रंगेहाथ पकडले़ संजय लक्ष्मण जेऊघाले (बक्कल नंबर ६६७) असे या अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी तक्रारदाराने तक्रार दिली होती़ या तक्रारीनुसार तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून देऊन मदत करण्यासाठी पोलीस हवालदार जेऊघाले यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी सापळा लावण्यात आला़ त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासमोरील अॅडल्फ आर्केड इमारतीतील सोनू रेस्टॉरंटसमोर तक्रारदाराकडून जेऊघाले यांना लाचेची चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार जेऊघाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
देवळाली कॅम्पच्या लाचखोर पोलीस हवालदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 8:35 PM
नाशिक : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून मदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच मागणा-या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि़१०) रंगेहाथ पकडले़ संजय लक्ष्मण जेऊघाले (बक्कल नंबर ६६७) असे या अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे़
ठळक मुद्देमदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल