नाशिक : तुमचे पत्र आहे का? अशी विचारणा करून घराजवळ उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत संशयिताने खेचून नेल्याची घटना दिंडोरीरोडवरील समृद्धी कॉलनीत शुक्रवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़सावरकर उद्यानामागील श्रीकृष्ण रो-हाउसमधील रहिवासी कृष्णा जवाहरप्रसाद चौरसिया या सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घराच्या गेटजवळ उभ्या होत्या़ त्यावेळी जॅकेट घातलेल्या संशयिताने तुमचे पत्र आहे का? अशी विचारणा करून त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़याप्रकरणी चौरसिया यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यूनाशिक : शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या इसमाचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) सकाळी पिंपळगाव खांब शिवारात घडली़ रामदास बाळू फनेडे (५०, रा. कौलपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास फनेडे यांना विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुंडलिक जाधव यांनी तत्काळ उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
बुलेटची चोरीनाशिक : सातपूर श्रमिकनगरच्या सातमाउली चौकातील रहिवासी सुनील ढाकणे यांची एक लाख ३० हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी (एमएच १५ जीजे २४७९) चोरट्यांनी केदार निवासातून चोरून नेली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़