नाशिक: २० टक्के अनुदानावर असलेल्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अद्यापही यश आलेले नसले तरी येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी आझाद मैदानावर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी नियोजन केले जात आहे.राज्यातील २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना म्हणजेच १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू आहे. या संदर्भात राज्यव्यापी बंदही पुकारण्यात आला होता तर आझाद मैदानावर निदर्शने देखील करण्यात आली आहेत. मात्र अजूनही यावर सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. आता सोमवार (दि. २६) रोजी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री व संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होणार आहे. अनुदानाचा टप्पा नक्की कोणता असावा याबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.अनुदानाचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी सोमवारी व मंगळवारी आपापल्या शाळा बंद करून मुंबई येथे महाआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून प्रचिलत टप्प्याची मागणी करण्यात आली आहे. पण शासन यामध्ये काटछाट करू शकते. किंवा शासन अघोषित शाळा घोषित करण्यासंदर्भात दिरंगाई करू शकते. त्याविरोधात आवाज उठविण्यासठी मुंबईत हजर राहाण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.येत्या सोमवारी आपापल्या शाळा बंद करून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी मिळून आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शंभर टक्के अनुदानावर सोमवारी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:33 PM
नाशिक : २० टक्के अनुदानावर असलेल्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अद्यापही यश आलेले नसले ...
ठळक मुद्देशाळा बंदचे आवाहन: मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा