शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नाशिक जिल्ह्याच्या पेठ, दिंडोरी तालुक्यातील सराईत घरफोड्यांच्या टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 6:47 PM

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ...

ठळक मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बलात्काराची शिक्षा भोगलेला म्होरक्या८३ मोबाईल फोन हस्तगत

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते़ या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घरफोडीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़

निरीक्षक करपे यांनी माहिती घेतली असता काही संशयित दिंडोरी तालुक्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव शिवारात मंगळवारी (दि़३१) रात्री सापळा रचून संशयित हरिदास बाळू निसाळ (२७), गणेश बाळू निसाळ (१९), कार्तिक नाना भोये (२०), राजू सुदाम निसाळ (२०, सर्व राहणार नाळेगाव ता. दिंडोरी) या चौघांना अटक केली तर श्रावण रामदास वाघमारे (२५) हा फरार आहे़

या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ, दिंडोरी, गिरणारे परिसरात घरफोड्या तसेच नाशिक शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ या संशयितांकडून विविध कंपन्यांचे ८३ मोबाईल फोन, मोबाईल अ‍ॅक्सेसरी, होम थिएटर, रेडिमेड कपडे, डीव्हीआर मशीन, चोरी केलेली पल्सर दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर दुचाकी तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्राइवर, पक्कड, लोखंडी कटवनी असा एकूण दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, पोलीस हवालदार प्रकाश् तुपलोंढे, हनुमंत महाले, दीपक अहिरे, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पोलीस नाईक वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, महिला पोलीस नाईक योगिनी नाईकयांनी ही कामगिरी केली़बलात्कारातील शिक्षा भोगलेला टोळीचा म्होरक्याघरफोडी करणाऱ्या या टोळीचा म्होरक्या हरीदास बाळू निसाळ याच्यावर दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने दिलेली सात वर्षांची शिक्षा भागून तो बाहेर आला आहे़ या आरोपींकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा