नाशिक : सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर हजर होत असतानाच दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अचानक पोलीसांचा ताफा दाखल झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांची अंगझडती घेण्यास प्रारंभ केला. पोलिस कशाबद्दल झडती घेत आहेत याबाबत जिल्हा परिषद प्रशासनासह सारेच साशंक होते. पोलिसांनी या मोहिमेत अनेक कर्मचाºयांच्या खिशातून गुटखा, तंबाखुपुडी तसेच सिगारेट पाकीटे बाहेर काढून संबंधितांना दंड ठोठावल्याने पोलिसांच्या या कारवाईविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.सर्वसाधारणपणे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सर्वानाच ज्ञात आहे. परंतु अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयाप्रमाणे पोलीस अंमली पदार्थांचा शोध घेत असल्याचे पाहून सारेच अचंबित झाले. अशाप्रकारची कारवाई जिल्हा परिषदेतच नव्हे तर शहरात प्रथमच झाल्याने पोलिसांच्या या कारवाईची दिवसभर जिल्हा परिषद आवारात चर्चा सुरू होती. सदर मोहिम नेमकी का राबविण्यात आली याची स्पष्टता अनेकांना झालेले नाही.सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद कर्मचारी कामावर हजर होत असतानांच खाकी वर्दीतील पोलीस आणि पोलीस कमांडोचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले आाणि त्यांनी कर्मचाºयांची अंगझडती घेण्यास प्रारंभ केला. या झडतीत कर्मचाºयांच्या खिशातील गुटखा, तंबाखुपुडी तसेच सिगारेट पाकीटे काढून ती जप्त करण्यात आली. तसेच संबंधितांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.पोलिस आयुक्तालयातील अनेक शासकीय कार्यालयाांमध्ये कोटपा कायद्यांतर्गत अशाप्रकारची विशेष मोहिम राबविण्यात आल्याचे समजते. कोटपा अर्थात तंबाखी नियंत्रण कायदा असून या कायद्यांतर्गत पोलिसांना बहाल करण्यात आलेल्या विशेष अधिकारात पोलिसांनी शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. सकाळी काही कर्मचारी कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेक कर्मचारी या मोहिमेतून वाचले मात्र अनेक कर्मचारी आणि काही अधिकरी या तपासणीत तंबाखुजन्य पदार्थ आणि गुटखा वापरतांना आढळून आले.पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केरीत अवघ्या तासभराच्या मोहिमेत कर्मचाºयांमध्ये चांगलाच वचकही निर्माण केला.--इन्फो--आमचे कर्मचारी नाहीतसकाळी कार्यालय सुरू होतानाच पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर काही कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र यातील सर्वच जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत. अनेक लोक सकाळी कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले होते. त्यांचाही त्यात समावेश असावा अशी सारवासारव जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.--इन्फो--उपाध्यक्षांच्या खासगी चालकालाही दंडजिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावीत यांच्या खासगी वाहन चालकावरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. गावित यांना घेऊन त्यांचा चालक आला होता. यावेळी पोलिसांनी झडती घेतली असता तंबाखुची पुडी आढळून आल्याने चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 8:28 PM
सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर हजर होत असतानाच दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अचानक पोलीसांचा ताफा दाखल झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांची अंगझडती घेण्यास प्रारंभ केला
ठळक मुद्देअचानक मोहिम : उपाध्यक्षांच्या खासगी चालकाला दंड पोलिसांच्या या कारवाईविषयी संभ्रमावस्था