नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नाशिक जिल्हा संघाचे अध्यक्ष सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिवाजी कासव यांच्या नावाची सूचना संपत सकाळे यांनी मांडली. त्यास योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. कावस यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदासाठी प्रमोद भाबड यांच्या नावाची सूचना विठ्ठल वाजे यांनी मांडली त्यास नीलेश अहेर यांनी अनुमोदन दिले. त्यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अर्चना सैंदाणे यांनी काम पाहिले.यावेळी संघाचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिवयुक्त अध्यक्ष, उपाध्यक्षांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील प्राथमिक मजूर सहकारी सस्थाच्या हितासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे अध्यक्ष कासव यांनी यावेळी सांगितले.--इन्फो--चिंतामण गावित यांचा राजीनामानाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संस्थेचे संचालक सुरगाणा येथील चिंतामण जाणू गावित यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा यावेळी जाहीर केला. सुरगाणा तालुका संचालक गावित यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीमाना देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. गावित यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केला आहे.
नाशिक जिल्हा मजूरसंघाची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:08 PM
नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्देअध्यक्षपदी शिवाजी कासव; उपाध्यक्षपदी प्रमोद भाबडचिंतामण गावित यांचा राजीनामा