नाशिक : वर्षानुवर्षापासून न्यायालयात प्रलंबित असलेले दाव्यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच वादी - प्रतिवादींमधील आपसी दुश्मनी करून करून वाद आपसी समझोत्याने मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि़९) जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होत आहे़ यामध्ये दावा दाखल पूर्वची (प्री लिटीगेशन) ५० हजार तर न्यायालयात प्रलंबित असलेले १४ हजार दावे ठेवण्यात आल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांपैकी १४ हजार १२ प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आले आहेत. त्यात ५,०९२ फौजदारी प्रकरणे (५०९२), धनादेश न वटणे (३,३०२), बँक दावे (२८१), मोटार अपघात (८५०), कौटुंबिक वाद (१,१०२), दिवाणी (१, ६१२), महापालिका (१,२०३) व इतर प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. यापैकी सुमारे पाच हजार प्रकरणे नाशिक न्यायालयातील असून त्यात फौजदारी (१,६३०) , धनादेश न वटणे(१,२५०), मोटार अपघाताची (७००) , कौटुंबिक वाद (१९७ ), दिवाणी प्रकरणे(५०० ), महापालिका (३००) व इतर प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत.राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व ५० हजार प्रकरणे ठेवण्यात आली असून त्यामध्ये नाशिकमधील ३० हजार प्रकरणांचा समावेश आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचापक्षकारांनी फायदा करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़--कोट--२५ हजार दाव्यांचे उद्दिष्ठजिल्हा विधी सेवा प्राधिकरण गत दीड महिन्यांपासून राष्ट्रीय लोकअदालतीसाठी काम करते आहे़ गत लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित सहा हजारपैकी १ हजार ८२, तर दावा दाखलपूर्व १२ हजार प्रकरणांपैकी एक हजार दावे निकाली काढण्यात आले होते़ यावेळी मोठ्या प्रमाणात दावे ठेवण्यात आले असून किमान २५ हजार दावे निकाली काढण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे़- एस़एम़ बुक्के, सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण़--कोट--जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून नोटीसीने कळविण्यात न आलेल्या व न्यायालयात केस प्रलंबित असलेल्या वादी-प्रतिवादींमध्ये तडजोडीची इच्छा असल्यास त्यांना शनिवारच्या (दि़९) राष्ट्रीय लोकअदालतीत आपला दावा वा केस ठेवता येणार आहेत़ राष्ट्रीय लोकअदालतीसमोर त्वरीत हा दावा ठेवून तो निकाली काढण्यात येईल़ यासाठी न्यायाधीश एस़एम़बुक्के (मोबाईल नंबर - ९४०३१७०७२२ किंवा ०२५३ - २३१४३०६) यांच्याशी संपर्क साधावा़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक
राष्ट्रीय लोकअदालतीत ६४ हजार दावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 6:17 PM
नाशिक : वर्षानुवर्षापासून न्यायालयात प्रलंबित असलेले दाव्यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच वादी - प्रतिवादींमधील आपसी दुश्मनी करून करून वाद आपसी समझोत्याने मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि़९) जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होत आहे़ यामध्ये दावा दाखल पूर्वची (प्री लिटीगेशन) ५० हजार तर न्यायालयात प्रलंबित असलेले १४ हजार दावे ठेवण्यात ...
ठळक मुद्देदावा दाखलपूर्व ५० हजार तर प्रलंबित १४ हजार दावे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़९) राष्ट्रीय लोकअदालत