नाशिक : सार्वजनिक ठिकाणी असलेली ७५ डेसिबलची ध्वनिमर्यादा, पोलिसांकडून मिळणारी गुन्हेगारांसारखी वागणूक, दाखल केले जाणारे गुन्हे यामुळे साउंड व लाइट व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सार्वजनिक ठिकाणची ध्वनिमर्यादा वाढवावी, ध्वनी तपासणीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा, गुन्हेगारासारखी वागणूक बंद करून केसेस मागे घ्याव्या या मागणीसाठी येत्या १५ आॅगस्टला नो साउंड (म्यूट डे) पाळला जाणार असल्याची माहिती नाशिक साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर वझरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़वझरे यांनी सांगितले की, सभा-समारंभाच्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिमर्यादेचे पालन करून लाउडस्पिकर लावणे शक्य नाही आणि समजा मागणीनुसार लावला की पोलीस गुन्हे दाखल करून कारवाई करतात़ त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सण-समारंभासाठी लाउडस्पीकर न देण्याचा निर्णयच प्रोफेशनल आॅडिओ लाइटिंग असोसिएशन (पाला) या देशव्यापी संघटनेने घेतला आहे़ पोलिसांकडून साउंड सिस्टीम व्यावसायिकांवरच कारवाई केली जाते, त्यांची कोणतीही बाजू ऐकून घेतली जात नाही़ प्रसंगी मारहाण तसेच महागड्या साधनांची मोडतोडही केली जाते़या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी होणारा दहीहंडी उत्सव व स्वातंत्र्य दिनासाठी जिल्ह्यातील कोणताही साउंड व्यावसायिक साधनसामग्री देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ आवाजाची क्षमता ही शेवटच्या माणसापासून मोजण्याची आवश्यकता असतानाही आपल्याकडे सदोष पद्धतीने ती मोजली जात असल्याचे वझरे यांनी सांगितले़ यावेळी नाशिक साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश पठाडे, सचिव पराग जोशी, अमित पोटे, अरविंद म्हसाणे, वैभव बकरे, राहुल जाधव, मकरंद थेटे, सतीश माने व पदाधिकारी उपस्थित होते़--इन्फो--१८ आॅगस्टला मूक मोर्चाध्वनिप्रदूषण हे फक्त साउंडमुळेच होते का? असा प्रश्न विचारण्यासाठी तसेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी साउंड सिस्टिम ओनर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे १८ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे़ बी़ डी़भालेकर मैदानापासून सुरू होणाºया या मोर्चात जिल्ह्यातील साउंड व डीजेचालक उपस्थित राहणार आहेत़
१५ आॅगस्टला साउंड व्यावसायिकांचा ‘म्यूट डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 10:33 PM
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी असलेली ७५ डेसिबलची ध्वनिमर्यादा, पोलिसांकडून मिळणारी गुन्हेगारांसारखी वागणूक, दाखल केले जाणारे गुन्हे यामुळे साउंड व लाइट व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सार्वजनिक ठिकाणची ध्वनिमर्यादा वाढवावी, ध्वनी तपासणीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा, गुन्हेगारासारखी वागणूक बंद करून केसेस मागे घ्याव्या या मागणीसाठी येत्या १५ आॅगस्टला नो साउंड ...
ठळक मुद्देपोलीस कारवाईचा निषेधदहीहंडी उत्सवासाठी साउंड न देण्याचा निर्णयजिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा